वाचकांच्या प्रतिक्रिया कहाणी म्हणजे वळणांचा रस्ता. प्रत्येक वळण एक अंदाज न लावता येणारा धक्का. मंजिरी देशमुख मायाच जगणं इतकं गुंतागुंतीच आहे की अंदाज बांधण अशक्य. शुभांगी देशपांडे स्त्री कळायला स्वतःत सुद्धा एक स्त्री जोपासायला लागते जुई कुलकर्णी मेंदू जड झाला. एखाद वाक्य अस काही लिहून जाता की जणू स्वप्नातून खाडकन जाग करावं कोणी आणि ओरडून सांगावं आपल्याला "बयो, कुठे रमते आहेस.? हेच सत्य आहे!" आणि कानात घुमत राहतात ती वाक्य. अभा अभिजीत मुळे
मी या गोष्टीच्या प्रेमात खोल खोल रुतत चाललेय प्राजक्ता खाडीलकर
दम लागला सगळं कवेत घेताना. आपण वाचत आहोत की त्या कथेत उपस्थित आहोत, सीमा रेषा उरलीच नाही. - वर्षा वेलणकर सर्वसाधारण स्त्रिया , सहन करतात पण बोलू शकत नाहीत...ते तुमच्या कथेच्या नायिका सहज सांगून जातात... तेच फार आवडतं....मनू, माया, शुभदा, निलू..... सगळ्यांशी गप्पा माराव्यात असं वाटतं आहे.....मस्त.... कहाणी मीनाक्षी मोहरील माया संपूर्ण उमजणे कठीणच.पण अपूर्णतेतून ती वाचकाला खिळवून ठेवते नजरबंदीने...... रेवती विजय खूप सुंदर ... लिखाण कसं असावं याचं प्रात्यक्षिकच मिळालं. 'माया' कायमची घर करून राहील मनात. अलका जतकर माया, अफलातून, to the skin and flesh ज्योति धर्माधिकारी
आयुष्याच्या एका वळणावर एक शोध आणि त्या मागची खळबळ निमावी,आणि शांत मनाने नवी सुरुवात व्हावी हे मला खूप भावलं अरुंधति
खूप सुंदर... तुमच्या शैलीचे, प्रतिभेचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. लेखकाला व्यक्तिनिर्मितीसाठी अधिक श्रेय द्यावे की कलाकृती निर्मितीसाठी अशा संभ्रमात मी पडलेय. सपना कदम आचरेकर फार सुंदर व्यक्ती चित्रंणं...एकेका प्रकरणात व्यक्तीचं चित्र मनात पूर्ण झालं..मनू ! खरं तर इथे निवेदक किंवा थर्ड पर्सन म्हणून जाणवते...तिच्याशी रीलेट होते का माया?.. तिला नेमकं या स्त्री बद्धल काय वाटतं? अभिमान..प्रेम..माया की निव्वळ औत्सुकय.. खूप आवडली पण अजून असायला हवी असं वाटतं .. अनेक पात्रांच्या अनुभवातून एखादी व्यक्ती रंगवणं ही कल्पनाच खूप भन्नाट आहे.. वैष्णवी अंदुरकर