गुढ, रहस्य लेखन प्रकारात आपला कायमचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही थरारक कादंबरी आहे. पूर्ण चंद्राच्या रात्री, लख्ख चांदण्यामध्ये त्या गुढ व्यक्तीपासून कथेला प्रारंभ होतो. तो उभा होता, तिथे ती आली. तिच्या डोळ्यात बुबळे नव्हती, चंद्रप्रकाशात चकाकणारे डोळे होते. ती आपल्या हातून मेली असं त्याला वाटलं.
तिचं शरीर पुरायचं होतं.पण ते शरीर होतं कुठे? ते सापडेना. या कथेत सरदेशपांडे आहेत, गोसावी आहेत, चंद्रसाहेब आहेत, पोलीस-हवालदार आहेत, रात्र आहे, चंद्र आहे, आणि त्यापेक्षा अधिक आहे ती गुढ रम्यता. ते गूढच कथेची उत्कंठता उत्तोरत्तर वाढवते.